shirol grampanchayat website logo

शिरोळ ग्रामपंचायतीची स्थापना सन १ जून १९४५ मध्ये झाली आहे.  ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये अनेक सोयी निर्माण केल्या आहेत तसेच अनेक कार्ये केली पूर्ण जातात. उदा. महात्मा गांधी रोजगार हमी योजना, इंदिरा आवास योजना, वृक्ष लागवड, मोफत गणवेश वाटप योजना अशा अनेक योजना राबविल्या जातात.

योजना –

ग्रामपंचायती मधील सरपंच, उपसरपंच,सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये सलोखा निर्माण करून गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतात. एखादा तंटा निर्माण झाल्यास सर्वजण सामोपचाराने निर्णय घेऊन पुन्हा तंटा होणार नाही याची खबरदारी घेत असतात. गावाचा विकास आढावा घेण्यासाठी मासिक मिटींग घेतली जाते. सदर मिटींगमध्ये गावच्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित निराकरण केले जाते. केंद्र सरकारच्या संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) योजनेमधून ग्रामपंचायतीचे सर्व लेखा व वित्त काम ऑनलाईन केलेले आहे. ग्रामपंचायती मध्ये १७ सदस्याची कमिटी आहे. यामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग असून आज गावातील महिला गावाच्या विकासाचे कार्य करताना दिसून येतात. त्याचप्रमाणे ग्रामपंचायती मध्ये नंदकुमार पारिसा निर्मळे हे ग्रामविकास अधिकारी हे आपले काम अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध रीतीने पूर्ण करीत आहेत. त्याचबरोबर १० क्लार्क रोजची नोंद घेऊन लेखी व वसुलीची कार्य करीत असतात.३ शिपाई व २० पाणीपुरवठा कर्मचारी, ३ वायरमन, ४९ आरोग्य विभागाचे कर्मचारी आपले दैनदिन कार्य करीत आहेत.
शिरोळ ग्रामपंचायतीचे हेडक्लार्क श्री.संदिप सिताराम चुडमुंगे हे शिरोळ तालुका  ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत.


एकूण हेक्टर क्षेत्रफळ

2614
एकूण क्षेत्रफळ
2404
सिंचनाखालील
210
सिंचनखाली नसलेले

लोकसंख्या एकूण

27649
लोकसंख्या एकूण
14216
पुरुष
13433
महिला

शुभ संदेश सरपंच


Shirol Grampanchayat sarppanch-min
शिरोळात सध्या अनेक सोयी उपलब्ध आहेत,यामध्ये उदयॊगधंदे,
व्यवसाय ,दवाखाने , दळणवळच्या सोयी निर्माण झाल्या आहेत.
गावात ग्रामपंचायत मार्फत विविध योजना राबिवल्या जातात. रोजगार हमी योजना,
पर्यावरण संतुलित समृद्ध योजना , निर्मल ग्राम तसेच
लेक वाचवा अभियान राबिवले जातात.

शुभ संदेश उपसरपंच


Shirol Grampanchayat upsarpanch-min

शिरोळचा सर्वागीण विकास हेच आमचे ध्येय ..!
शिरोळ गावाचा आम्ही पदभार स्वीकारल्यापासून विविध विकास योजना राबिवल्या आहेत.
यामध्ये पंचगंगा नदीचे संरक्षण , शिरोळ तंटामुक्त गाव , संजय गांधी निराधार योजना,
राजीव गांधी योजना , वातानुकूलित नाट्यगृह,स्मशानभूमी तसेच शासकीय
फंडातून अंदाज रुपये १२ कोटीची विविध विकास कामे मार्गी लावली आहेत.

पुरस्काराने सन्मानित 

१ .हागणदारीमुक्त ग्रामपंचायत २००९/१०
२. महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामपंचायत पुरस्कार
३. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेत यशस्वी सलग वर्ष सहभाग
४. स्मार्ट ग्राम पुरस्कार सन २०१६/१७
५. यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार सन २०१५/१६
६. यशवंत सरपंच पूरसाकार सन २०१५/१६
७. सर्व शासकीय योजना राबविणारी ग्रामपंचायत पुरस्कार सन २०१५/१६


अभिप्राय

  • यादव पॅनलने चार वर्षाच्या कार्यकाळात अनेक विकास कामे केली आहेत. उपसरपंच पृथ्वीराज
    यादव या युवा कार्यकर्त्या कडून नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

    बाळासाहेब माळी
    (जेष्ठ पत्रकार)